Type Here to Get Search Results !

बुलडाणा सायबर पोलीसांची मोठी कामगिरी! ‘डिजिटल अरेस्ट’ फसवणूक प्रकरणातील 10 लाखांपैकी तब्बल 9.94 लाख रुपये परत!

  बुलडाणा सायबर पोलीसांची मोठी कामगिरी!

‘डिजिटल अरेस्ट’ फसवणूक प्रकरणातील 10 लाखांपैकी तब्बल 9.94 लाख रुपये परत! 

मेहकर बुलेटिन एक्सप्रेस न्युज



बुलढाणा, दि. 14 

सायबर गुन्ह्यातील गंभीर प्रकार मानल्या जाणाऱ्या ‘डिजिटल अरेस्ट’ फसवणूक प्रकरणात बुलडाणा सायबर पोलीसांनी प्रभावी कारवाई करून तक्रारदाराचे 10 लाखांपैकी 9,94,300 रुपये परत मिळवून देत मोठी कामगिरी बजावली आहे. 

बुलढाणा पोलीसांची कामगिरी

तक्रारदार विनोदकुमार साळोक व त्यांच्या पत्नीला खोट्या सीबीआय व ट्राई अधिकाऱ्यांच्या नावाने धमक्या देऊन 20–24 ऑगस्ट 2025 दरम्यान 10 लाख रुपये एक्सिस बँकेतील खात्यात भरायला भाग पाडण्यात आले होते. तक्रार मिळताच सायबर पोलीसांनी तातडीने सर्व खाते व्यवहार गोठवून, तांत्रिक तपास करून मिझोरम राज्यातील खात्यातील रक्कम सुरक्षित केली आणि न्यायालयीन आदेशानंतर ती तक्रारदारास परत मिळवून दिली.


ही कारवाई

पोलीस अधीक्षक निलेश तांबे,

अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड

यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.


तपास पथक –

पोनि प्रकाश सदगर,

तपास अधिकारी पो.नि. संग्राम पाटील,

सपोनि प्रमोद इंगळे,

पोहेकॉ रामेश्वर मुंढे, प्रशांत गावंडे, राहुल इंगळे, केशव पुढे

यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. 


 नागरिकांसाठी महत्त्वाचे आवाहन (पोलीस अधीक्षक निलेश तांबे)


🔸 “डिजिटल अरेस्ट” असा कोणताही प्रकार अस्तित्त्वात नाही.

🔸 पोलीस किंवा कोणतेही विभाग WhatsApp कॉल/व्हिडिओ कॉल करून कधीही अटक करत नाहीत.

🔸 अनोळखी नंबरवरून येणारे कॉल त्वरित कट करा.

🔸 फसवणूक झाल्यास त्वरित संपर्क करा:

📞 1930 / 1945 – राष्ट्रीय सायबर क्राइम हेल्पलाइन

🌐 cybercrime.gov.in

📍 किंवा नजीकचे पोलीस स्टेशन / सायबर पोलीस स्टेशन, बुलढाणा

 सजग रहा – सुरक्षित रहा!

बुलडाणा जिल्हा पोलीसांची केले अवाहन

Post a Comment

0 Comments