एचआयव्ही जनजागृतीसाठी तालुकास्तरावर प्रशिक्षण — सर्व विभागांचा समन्वयित सहभाग आवश्यक – जिल्हा शल्य चिकित्सक
मेहकर बुलेटिन एक्सप्रेस न्युज
बुलढाणा, दि. 14
जिल्ह्यात एचआयव्ही/एड्स प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी विविध विभागांमध्ये समन्वय वाढवून जनजागृती बळकट करण्यावर भर देण्यात आला आहे. तालुकास्तरावर लवकरच प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार असून सर्व विभागांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांनी केले.
आंतरविभागीय बैठकीत उपचारातील सातत्य, समुपदेशन आणि उपलब्ध आरोग्य सुविधांमुळे एड्समुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये घट झाल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले. युवकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी महाविद्यालयांतील Red Ribbon Club च्या माध्यमातून संवाद वाढवण्याचे निर्देश देण्यात आले.
🔴 एचआयव्ही एड्स प्रतिबंध व नियंत्रण कायदा 2017
एचआयव्ही संक्रमित व्यक्तींविरुद्ध भेदभाव करणे हे कायद्याने दंडनीय आहे. उपचारास नकार देणे, भेदभाव, कलंकित करणे अशा प्रकारांवर संबंधित संस्था/व्यक्तींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे उपस्थित अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
चला, एचआयव्ही मुक्त समाजाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकूया!

Post a Comment
0 Comments