महिलांच्या आरोग्याच्या दिशेने बुलढाण्यात महत्वाचे पाऊल! 🌸
मेहकर बुलेटिन एक्सप्रेस न्युज
बुलढाणा जिल्ह्यात HPV (ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस) लसीकरण मोहीम लवकरच सुरू होणार आहे. या मोहिमेअंतर्गत 14 ते 15 वर्षे वयोगटातील मुलींना मोफत लस दिली जाईल, जी गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण करते.
जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी सांगितले की, हा उपक्रम महिलांच्या दीर्घकालीन आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचा आणि ऐतिहासिक पाऊल आहे.
💉 HPV लस घेण्याचे फायदे:
गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा धोका ९९% कमी होतो.
लक्षणे सुरुवातीला दिसत नसल्यामुळे पूर्व प्रतिबंध खूप महत्त्वाचा आहे.
लसीकरणामुळे मृत्यू व शारीरिक त्रास टाळता येतो.
मोहिमेबाबत:
शाळांमार्फत सर्वेक्षण सुरू आहे.
ग्रामीण आणि शहरी भागातील मुलींना प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये व जिल्हा रुग्णालयांमध्ये लस उपलब्ध.
डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे.
🚨 महिलांनी नियमित आरोग्य तपासणी करणे, वैद्यकीय सल्ला घेणे आणि HPV लसीकरणाबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे.
‘आरोग्यदायी माता – सशक्त समाज’ या उद्देशासाठी हा उपक्रम मोठे पाऊल ठरणार आहे.
HPV लसीकरण महिलांचेआरोग्य CervicalCancerPrevention BuldhanaHealth सशक्तसमाज


Post a Comment
0 Comments