Type Here to Get Search Results !

परवानाधारकाकडील शस्त्रे पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्याचे जिल्हादंडाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे निर्देश

 परवानाधारकाकडील शस्त्रे पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्याचे जिल्हादंडाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे निर्देश

मेहकर बुलेटिन एक्सप्रेस न्युज


बुलढाणा, दि. 13 (जिमाका): स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील परवानाधारकांकडे असलेली शस्त्रे जमा करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी परवानाधारकांनी आपल्या शस्त्रांची त्वरीत पोलीस स्टेशनमध्ये जमा करावीत, असे निर्देश दिले आहेत.


🔹 मार्गदर्शक सूचना:


बँका, संस्था, सोनार, देवस्थान आणि पेट्रोल पंप धारक यांना शस्त्रे जमा करण्यापासून सूट.


नगरपरिषद / नगरपंचायत क्षेत्रातील सर्व शस्त्र परवानाधारकांनी आपली शस्त्रे जमा करावीत.


सूट मिळविण्यासाठी पोलीस विभागाकडे सविस्तर पडताळणीसह विनंती अर्ज दाखल करावा.


गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकलेले किंवा निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था भंग करणारे परवानाधारक यांच्याकडील शस्त्रे तात्काळ जमा करण्यात यावीत.


जिल्हा प्रशासनाने सर्व परवानाधारकांना आवाहन केले आहे की, निवडणुकीदरम्यान शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे.

Post a Comment

0 Comments