( मेहकर:बुलेटिन एक्सप्रेस न्युज)
दिनांक -१३/११/२५
मेहकर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेहकर-लोणार मतदारसंघात राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होत आहेत. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि माजी आमदार संजय रायमुलकर यांना आमदार सिद्धार्थ खरात यांनी मोठा राजकीय धक्का दिल्याच चित्र दिसत आहे .
शिंदे सेनेतील अंतर्गत गटबाजी आता उघडपणे समोर येत असून, आमदार सिद्धार्थ खरात यांच्या शांत, संयमी आणि सर्वसमावेशक कार्यपद्धतीमुळे सर्वसामान्य नागरिक त्यांच्याशी जोडले जात आहेत. या पार्श्वभूमीवर देऊळगाव साकर्शा येथील शेकडो शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांनी राजीनामा देत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
या प्रवेशामुळे शिंदे गटाला मोठा फटका बसला असून, मेहकर तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.


Post a Comment
0 Comments