Type Here to Get Search Results !

विधिमंडळात आमदार खरातांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारचे वेधले लक्ष

 विधिमंडळात आमदार खरातांनी 

शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारचे वेधले लक्ष


मेहकर बुलेटिन एक्सप्रेस न्युज




नागपूर येथे सुरू असलेल्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात मेहकर लोणार मतदार संघाचे शिवसेना (उबाठा)चे आमदार सिद्धार्थ खरात यांनी  शेतकऱ्यांच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि तातडीच्या प्रश्नावर औचित्याचा मुद्दा उपस्थित करत महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधले मागेल त्याला सौर पंप  योजना यामध्ये बदल करून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी त्यांनी अधिवेशनात ठामपणे मांडली आमदार सिद्धार्थ खरात यांनी सांगितले की अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी ०.५०   ते १  किंवा १.५  एकर  एक कर आशा छोट्या गट क्रमांक येतात शासनाच्या विद्यमान नियमानुसार दोनएकरा पर्यंत ३ एचपी सौर पंप २ते ५ एकर  पर्यंत ५ एचपी ५ एकापेक्षा जास्त ७.५ एचपी सौर पंप देण्यात येतो  परंतु ३ एचपी पंप छोट्या गटातील  खोल विहरीतून पाणी उचलू शकत नाही  त्यामुळे शेतकऱ्यांचा  पैसा कष्ट आणि पीक दोन्ही धोक्यात येतात यावर उपाय म्हणून त्यांनी शासनाला विनंती केली की गट क्रमांक मधून क्षेत्रफळाची आठ शिथिल करावी एक किंवा दोन एकर क्षेत्र असले  तरी त्या विहिरीला किमान ५ किंवा ७.५  एचपी सौर पंप देण्यात यावा यासह एकच गटातील धारण क्षमता ठरवण्याची विद्यमान मर्यादा बदलण्याची मागणी खरात यांनी केली व अनेक ठिकाणी पाण्याचे स्त्रोत दूर असल्याने सोलर पंपाने पाणी ओढणे शक्य नाही डोंगराळ भाग किंवा चढाव असल्याने पाईपलाईन सोलर पॅनल लावण्यासाठी जागा उपलब्ध नाही किंवा पावसाळ्यात पुराचा धोका अशा परिस्थितीत  संदर्भित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून त्या शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यासाठी धोरणात्मक तरतूद करावी अशी मागणीही आमदार खरात यांनी शासनासमोर मांडली २०२२ पासून अनेक शेतकऱ्यांनी नवीन कृषी वीज जोडणी साठी अर्ज करून वीज मिळालेली नाही असा महत्त्वपूर्ण मुद्दा खरात यांनी उपस्थित केला ते याबाबत बोलताना म्हणाले की ज्यांनी पैसे भरले त्याला तत्काळ वीज जोडणी देणे हे शासनाचे कर्तव्य आहे असे ठणकावून सांगितले तर शेतकऱ्यांच्या अडचणी भौगोलिक परिस्थिती आणि प्रत्यक्ष जमिनीवरील अडथळे लक्षात घेऊन स्वर पंप योजनेच्या अटी सुदारीव्यात

तसेच नवीन वीज जोडण्या तातडीने द्याव्यात अशी  आग्रही मागणी आमदार सिद्धांत खरात यांनी यावेळी केली

Post a Comment

0 Comments