तेजस्वी महाराज वरोडी वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील वरोडी येथील सुप्रसिद्ध अध्यात्मिक मार्गदर्शक, परमहंस तेजस्वी महाराज (वरोडी) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून ही वार्ता अत्यंत दुःखद व हृदयद्रावक आहे.
वरोडी येथील आश्रमाच्या माध्यमातून परमहंस तेजस्वी महाराजांनी आयुष्यभर अध्यात्मिक, धार्मिक तसेच सामाजिक कार्य केले. त्यांच्या उपदेशातून व मार्गदर्शनातून असंख्य भक्तांना सदमार्गाची प्रेरणा मिळाली. त्यांच्या विचारांनी, साधनेने व सेवाभावाने समाजाला नवी दिशा मिळाली.
अशा या थोर संतपुरुषाच्या निधनाने अध्यात्मिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. परमहंस तेजस्वी महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत असून त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात येत आहे.


Post a Comment
0 Comments