मेहकर तालुक्यातील परतापूर शाळेत महापरिनिर्वाण दिनानिमित्त विद्यार्थ्यांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
मेहकर बुलेटिन एक्सप्रेस न्युज
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील परतापुर येथील जिल्हा परिषद शाळेत महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने शाळेचे शिक्षक नितीन शेळके यांनी खडूच्या साहाय्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अद्भुत आणि आकर्षक चित्र साकारले. त्यांच्या या कलाकृतीचे विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी कौतुक केले.
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शाळेत त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमात देशाच्या संविधान निर्मात्यांविषयी विद्यार्थ्यांना माहिती देत संविधान मूल्यांची जानिव करून देण्यात आली.
या वेळी शाळेचे मुख्याध्यापक जे. पी. धांडे ,शिक्षक काटकर सर, सवालकर सर,नितीन शेळके, प्रफुल ठोकरे, शितल मेरत ,नीता दळवी, संतोष पातळे उपस्थित होते
परतापुर येथील ही जिल्हा परिषद शाळा इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत चालत असून शाळेची एकूण विद्यार्थी संख्या १९० आहे.


Post a Comment
0 Comments