हिवाळी अधिवेशनानंतर आमदार सिद्धार्थ खरात यांची वरोडी येथे भेट श्री तेजस्वी महाराज यांच्या समाधीचे घेतले श्रद्धेने दर्शन
मेहकर, दि. १४
मेहकर जवळील सिंदखेडराजा तालुक्यातील वरोडी येथील परम् पूज्य संत श्री तेजस्वी महाराज यांनी वयाच्या नव्वदाव्या वर्षी शनिवार दि. १३ डिसेंबर रोजी रात्री पावणे आठच्या सुमारास आपले अवतारकार्य संपविले. त्यानंतर रविवार दि. १४ डिसेंबर रोजी श्री तेजस्वी संस्थान, वरोडी येथे जय गजानन, श्री गजाननच्या जयघोषात त्यांच्या समाधीची स्थापना करण्यात आली.
हिवाळी अधिवेशन सुरू असल्याने तसेच अधिवेशनाचा शेवटचा दिवस असल्यामुळे कार्यक्रमाला उपस्थित राहता न आल्याने आमदार सिद्धार्थ खरात यांनी आज दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता वरोडी येथे भेट देत परम् पूज्य संत श्री तेजस्वी बाबा यांच्या समाधी स्थळी जाऊन श्रद्धेने दर्शन घेतले.
यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मेहकर तालुका प्रमुख निंबाजी पांडव, मेहकर शहर प्रमुख किशोरभाऊ गारोळे, संस्थानचे विश्वस्त लक्ष्मण गारोळे, अध्यक्ष श्याम जाजू, युवा सेना तालुका अधिकारी ॲड. आकाश घोडे, चायगाव सर्कल प्रमुख साहेबराव हिवाळे, वरोडीचे सरपंच सुधाकर गारोळे, मोहन गारोळे, मनोहर गारोळे, संजय गुंजकर, काशिनाथ गारोळे, विनोद गारोळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
परम् पूज्य संत श्री तेजस्वी बाबा यांच्या संस्थानास तीर्थक्षेत्र ‘ब’ दर्जा मिळवून देण्यासाठी आमदार सिद्धार्थ खरात यांचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. बाबांची तब्येत अस्वस्थ असताना दि. ८ डिसेंबर २०२५ रोजी आमदार खरात यांनी वरोडी येथे येऊन बाबांचे दर्शन घेतले होते व त्यांचा आशीर्वाद घेतला होता.
आज बाबा आपल्यात नसल्याचे दुःख मनात असून, त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, अशी प्रार्थना आमदार सिद्धार्थ खरात यांनी यावेळी केली.

Post a Comment
0 Comments