बुलढाणा ब्रेकिंग
जगप्रसिद्ध लोणार सरोवरातील पाण्याच्या पातळीत दिवसेदिवस होतय प्रचंड वाढ सरोवरातील कमळजा देवीचं मंदिर १५ फुट पाण्यात
सरोवरातील पाण्याच्या पातळीत का वाढ होतय याचं कारण अस्पष्ट..
मेहकर बुलेटिन एक्सप्रेस न्युज
गेल्या सहा महिन्यापासून खाऱ्या पाण्याच्या लोणार सरोवरातील पाण्याच्या पातळीत प्रचंड वाढ होताना दिसत असल्याने चिंतेची बाब निर्माण झाली आहे, ५२ हजार वर्षांपूर्वी उल्कापात निर्मित खाऱ्या पाण्याच्या लोणार सरोवरात मागील काळात मासे आढळून आली त्यावर बरीच चर्चा झाली तसेच सरोवरात आत चारही बाजून असंख्य हेमांडपंथी मंदिरे आहेत .. त्यात कमळजा देवीचं मंदिर भाविकांचं श्रद्धास्थान आहे हे मंदिर कधीच पाण्याखाली गेले नाही मात्र यावेळे हे मंदिर १५ फुट पाण्यात गेले आहे.. त्यामुळे लोणार खाऱ्या पाण्याचे सरोवर पुन्हा चर्चेत आले आहे.. सरोवरातील पाण्याच्या पातळीत का वाढ होत आहे याचा अद्याप पर्यंत शोध लागला नाही विदेशातून असंख्य पर्यटक, शास्त्रज्ञ अभ्यासासाठी लोणार येथे येत असतात मात्र खाऱ्या पाण्याच्या सरोवरात मासे का आढळत आहे व पाण्याच्या पातळीत का व कुठून वाढ होत आहे हे अद्याप अस्पष्ट आहे.. यावर संशोधन होने गरजेचे आहे याकडे संबधित पुरातत्व विभागाचे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले आहे....

Post a Comment
0 Comments