Type Here to Get Search Results !

मेहकर तालुक्यातील गुरांचे डॉ, मनोज वानखेडे अहोरात्र गुरसेवेत कार्यरत

 मेहकर तालुक्यातील गुरांचे 

डॉ, मनोज वानखेडे अहोरात्र गुरसेवेत कार्यरत 


मेहकर बुलेटिन एक्सप्रेस न्युज


मेहकर:१७-१२-२०२५



ग्रामीण भागात पशुवैद्यकीय सेवा वेळेवर मिळणे हे मोठे आवाहन असताना डॉ. वानखेडे यांनी रात्र सेवा देत अनेक शेतकऱ्यांचे पशुधन वाचवले आहे कठीण परिस्थितीत पावसात वादळातही ते शेतकऱ्यांच्या दारात पोहोचतात त्यामुळे शेतकरी वर्गात त्यांच्याबद्दल विशेष  आदर आणि विश्वास निर्माण झाला आहे




बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात गुरांचे डॉ, म्हणून परिचित असलेले डॉ. मनोज वानखेडे हे अहोरात्र गुरांच्या सेवेत कार्यरत असलेले समर्पित व्यक्तिमत्त्व आहेत. पावसाळा असो, किंवा कडाक्याची उन्हाची वेळ असो किंवा मध्यरात्र—आजारी जनावरांच्या उपचारासाठी  एका, कॉल वत ते तात्काळ घटनास्थळी पोहोचतात.

मेहकर तालुक्यातील ग्रामीण भागात जसेकी, खंडाळा,खानापूर, जामगाव,साबरा.शेंदला,नायगाव दत्तापूर,मोळा मोळी, अंजनी बु,लोणीगवळी,डोणगाव, हिवरा साबळे, उखळी सुखळी,सोनाटी,बोरी,रत्नापूर, नागापूर, , उखळी, सुकळी, सोनाटी, चिंचोली, बोरी, बदनापूर, जानेफळ, लव्हाळा, अमडापूर  आणि ता. चिखली, लोणार, खामगाव, शेगाव, मालेगाव, जि. वाशिम. अमरावती, आकोला, बुलढाणा. 

या  जिल्ह्यमध्ये व गावांमध्ये त्यांनी केलेल्या गुरसेवेचा लाभ शेकडो शेतकऱ्यांना व भूमिहीन.नागरीकांना.मिळाला आहे.ग्रामीण भागातील शेतकरी वर्गासाठी डॉ. वानखेडे हे आधारवड ठरत आहेत. आपत्कालीन प्रसंगी दुर्गम भागातही ते कोणताही संकोच न करता जाऊन जनावरांवर उपचार करतात. उपचारांसोबतच लसीकरण, विविध संसर्गजन्य आजारांबाबत जनजागृती तसेच पशुसंवर्धनाविषयी मार्गदर्शन ते सातत्याने करत आहेत.

त्यांच्या निस्वार्थ सेवेमुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान टळले असून, जनावरांचे प्राण वाचले आहेत. “गुरे हीच शेतकऱ्यांची खरी संपत्ती आहे” या भावनेतून ते प्रामाणिकपणे आपले कार्य बजावत असून, त्यांच्या कार्याबद्दल शेतकरी वर्गातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

अशा सेवाभावी डॉक्टरांमुळे ग्रामीण भागातील पशुसंवर्धन अधिक बळकट होत असून, डॉ. मनोज वानखेडे यांचे कार्य निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे,

Post a Comment

0 Comments