Type Here to Get Search Results !

ना धनुष्यबाण चालला ना कमळ फुलले :मेहकर नगर परिषद वर गनिमी काव्या ने उबाठाचा भगवा नगराध्यक्षपदी किशोर गारोळे विजयी

ना  धनुष्यबाण चालला ना कमळ फुलले :मेहकर नगर परिषद वर 

गनिमी काव्या ने उबाठाचा भगवा नगराध्यक्षपदी किशोर गारोळे विजयी 


मेहकर :गजानन राऊत

मेहकर दि:२१-१२-२०२५



मेहकर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचा होमग्राउंड असलेल्या मेहकर नगर परिषदेत राजकीय भूकंप झाला असून परिवर्तनाच्या लाटेत प्रस्थापितांची सत्ता वाहून गेली आहे नगराध्यक्ष पदाच्या अटीतटीच्या लढाईतील शिवसेना (उबाठा ) ठाकरेचे किशोर गारोळे यांनी विजयाची मशाल फडकवत थेट सत्तेला वसन घातली या निकालाने केवळ सत्तेचे समीकरण बदलले नाही, तर आगामी निवडणुकीपूर्वी महायुतीच्या गोटात चिंतेचे ढग गडद केले आहेत या निवडणुकीत, वैयक्तिक , प्रतिष्ठेचा मोठा पेज पाहायला मिळाला किशोर गारोळे यांनी केवळ निवडणूक जिंकली नाही तर आपल्या वडिलांच्या प्रभावाचा इतिहासिक हिशोबही चुकता केला गेल्या निवडणुकीत त्यांचे वडील भास्करराव गारोळे हे २०१६ मध्ये यांचा कासम गवळी यांनी २२०० मताने प्रराभव केला होता त्याच कासम गवळींना किशोर गारोळे यांनी १०२३९हजार मते घेत १,२३८ मतांच्या फरकाने धूळ चारली काँग्रेस पक्षाचे कासम गवळी ९००२ आता सह दुसऱ्या साथीदारावर राहिले स्वत:केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी प्रचाराची धुरा हाती घेऊनही शिवसेना( शिंदे )गटाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला त्यांचे उमेदवार अजय उमाळकर ८,१६० मते, घेऊन तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले भाजपाचे स्थिती तर, अत्यंत दयनीय झाली असून त्यांचे सर्व २२ उमेदवार धुळीस मिळाले आहेत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सारंग माळेकर यांना साधे ५०० मतांचे संकुलनही पार करता आले नाही जिल्ह्याच्या राजकारणातील सर्वात मोठी नामुष्की ठरली आहे काँग्रेसचा वरचष्मा नगराध्यक्ष पद (उबाठा )कडे गेले असले तरी नगरसेवक संख्येच्या बळावर काँग्रेसने ११ जागा जिंकून सभागृहात आपले मोठेपण सिद्ध केले आहे शिंदे गटाला ९ तर उबाठा ६ जागांवर समाधान मानावे लागले महाविकास आघाडीच्या एकत्रित १७ जागांनी सत्ताधाऱ्यांची कोंडी केली आहे दिग्गजांचे पतन आणि नव्या दमाचे विजयी निवडणुकीच्या रिंगणात अनेक बड्या नेत्यांना मतदारांनी नाकारले यामध्ये पराभूत चेहरे शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुख कविताताई दांडगे युवा सेनेचे भूषण घोडे माजी नगराध्यक्ष अशोक आडलकर यांच्या पत्नी लता आढळकर एडवोकेट सुरेशराव वानखेडे यांच्या पत्नी शोभाताई वानखेडे आणि माझी नगराध्यक्ष डॉ. एम. पी. चांगाडे विजयी शिलेदार शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुरेश तात्या वाळूकर माजी नगराध्यक्ष विलास चाणखुरे दीपिका रहाटे ओम सौभागे मनोज जाधव यांनी विजयाची परंपरा राखली पत्रकार निसार अन्सारी यांच्या पत्नी अफिया अन्सारी आणि श्याम उमाळकर यांचे पुतणे वैभव उमाळकर यांनाही बाजी मारली विशेष म्हणजे किशोर गारुळे आणि त्यांच्या पत्नी रूपाली गारोळे या दांपत्यांनी नगरपालिका सभागृहात प्रवेश निश्चितच केला आहे हा निकाल म्हणजे केवळ एका नगर परिषदेचा विजय नसून बुलढाणा जिल्ह्यातील बदलत्या राजकीय वाऱ्याची स्पष्ट पावती आहे




 किशोर गारोळे (विजयी) उबाठा

 १०,२३९ 

 कासम गवळी (काँग्रेस) 

९००२

 अजय उमाळकर( शिंदे गट)

८,१६०

सारंग माळेकर (भाजप)

 ४३७

Post a Comment

0 Comments