Type Here to Get Search Results !

केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव व काँग्रेसच्या हर्षल सपकाळांना धक्का; सिद्धार्थ खरात यांच्या नेतृत्वाचा विजय

 मेहकर मध्ये उबाठाचा डंका नगराध्यक्षपदी किशोर गारोळे


केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव व काँग्रेसच्या हर्षल सपकाळांना धक्का; सिद्धार्थ खरात यांच्या नेतृत्वाचा विजय  

 


मेहकर गजानन राऊत

21/12/2025



संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या मेहकर नगर परिषद च्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने, बाजी मारली आहे न्यायालयीन प्रक्रियेमुळे लांबणीवर पडलेल्या निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला असून ठाकरे गटाचे उमेदवार किशोर भास्करराव गारोळे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांना पराभूत करत नगराध्यक्षपदावर नाव कोरले आहे या विजयाने मेहकर मध्ये पुन्हा एकदा मशाल पेटली असून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष , हर्षवर्धन सपकाळ यांना हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे 



मेहकर नगरपरिषदेसाठी २डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती मूळ वेळापत्रकानुसार 3 डिसेंबर रोजी निकाल अपेक्षित होता परंतु न्यायालयीन प्रक्रियेमुळे मतमोजणी थांबवण्यात आली होती अखेर शनिवारी 21 डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात आला नगराध्यक्ष पदासाठी एकूण सात उमेदवार रिंगणात होते तर 26 नगरसेवक पदासाठी 131 जणांनी नशीब आजमावले शहरातून एकूण 37 हजार 938 मतदार असून त्यापैकी 28 हजार 230 जणांनी (74 ,41) टक्के मतदानाचा हक्क बाजा आला होता अंतिम निकालात ठाकरे गटाचे किशोर गारोळे यांनी 10 हजार 239 मते मिळवत विजय संपादन केला त्यांनी काँग्रेसचे उमेदवार कासम पेरू गवळी यांचा पराभव केला ज्यांना 92 मते मिळाली तर शिवसेना शिंदे गट पक्षाचे अजय अरविंद उमाळकर यांना 8 हजार 160 मतावर समाधान मानावे लागले विशेष म्हणजे या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली असून त्यांच्या उमेदवाराला अवधी 467 मते मिळाली आहेत नगरसेवक पदाच्या निवडणुकीत मात्र श्रमिक कॉल पाहायला मिळाला यामध्ये काँग्रेसचे सर्वाधिक 11 नगरसेवक निवडून आले आहेत त्या खालोखाल शिवसेना शिंदे गट 9 आणि शिवसेना ठाकरे गट पक्षाचे सहा नगरसेवक विजय झाले आहेत या निवडणुकीत दिगज्याची प्रतिष्ठापनाला लागली होती केंद्रीय राज्यमंत्री तथा खासदार प्रतापराव जाधव शिंदे गटाचे अजय उमाळकर यांच्यासाठी तर काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांनी कासम गवळी यांच्यासाठी ताकद लावली होती मात्र आमदार सिद्धार्थ खरात यांनी ठाकरे गटाचे किशोर गारोळे यांच्यासाठी केलेली व्यूहरचना यशस्वी ठरली नंतरच्या जनतेने आमदार खरात यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत गारोळे यांना भरभरून मतदान केल्याचे या निकालावरून स्पष्ट झाले आहेत



 नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांना मिळालेली मते

किशोर भास्कर गारोळे शिवसेना उभाटा 10239 ( विजयी) 

(काँग्रेस) 9002



अजय अरविंद उमाळकर शिवसेना (शिंदे गट) 8160

सारंग प्रकाश माळेकर (भाजप) 467

 सारिका शिवाजी गवळी (बसपा) 159

कुरेशी शेख मुकीम (वंचित) 89

कुणाल प्रल्हाद माने (अपक्ष )74


पक्षनिहाय नगरसेवक संख्याबळ

 (काँग्रेस) 11 शिवसेना( शिंदे गट )9 शिवसेना (उबाठा) 6

Post a Comment

0 Comments