https://www.mehkarbuletinexpress.in.net/2025/12/blog-post_54.html पाच महिन्यांच्या गर्भवतीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
मेहकर दि. २३ (गजानन राऊत)
एका २१ वर्षीय नवविवाहिता तथा
पाच महिन्यांच्या गर्भवती महिलेने सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना आज २३ डिसेंबर रोजी माळेगाव (ता.मेहकर )येथे घडली. याप्रकरणी जानेफळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीना अटक करण्यात आली आहे.
जानेफळ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या माळेगाव येथील साधना विष्णू चोडकर (वय २१ वर्ष) या महिलेचा विवाह २०२४ मध्ये विष्णू रामाभाऊ चोडकर (रा माळेगाव) यांच्यासोबत
झाला होता तू आल्यानंतर काही दिवस ठिकाणी संसार करणारी साधना गर्भवती राहिली. मात्र ,
कालांतराने तिला सासरकडून शारीरिक व मानसिक त्रास सुरू झाला. हा त्रास असाह्य झाल्याने साधनाने आज २३ डिसेंबरच्या सकाळी गावातील सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच जानेफळ पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली
घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. तोवर साधनाच्या माहेरील (वाकदवाडी जि वाशिम) येथील नातेवाईकांनी माळेगाव गाठून मुलीला
सासरच्या मंडळी कडून त्रास असल्याने तिने आत्महत्या केल्याचे सांगत जोवर गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करत नाही तोवर मृतदेह ताब्यात घेणार नसल्याती भुमिका घेतली. त्यामुळे बराच वेळ
तणावाचे वातावरण निर्माण झाले परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून मोठ्या तत्परतेने सासू शोभा रामभाऊ चोडकर याला माळेगाव तर पती विष्णू चोडकर याला ठाणेदार अजिनाथ मोरे ,पोलीस उपनिरीक्षक संतोष जाधव , पोलीस अमलदार मोहन सावंत,
विशाल धोंडगे , विष्णू याला तांत्रिक माहितीच्या आधारे अहिल्यानगर इथून अटक केली. नातेवाईकांच्या संमतीने साधनाचा मृतदेह मेहकर येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला . शवविच्छेदनानंतर माहेरच्यांनी मृतदेह ताब्यात घेतला दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे, यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.


Post a Comment
0 Comments