Type Here to Get Search Results !

वेणी येथे संत आश्रूबाबा महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्याची सांगता आमदार सिद्धार्थ खरात यांची विशेष उपस्थिती

 


वेणी येथे संत आश्रूबाबा महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्याची सांगता

आमदार सिद्धार्थ खरात यांची विशेष उपस्थिती


मेहकर बुलेटिन एक्सप्रेस न्युज




मेहकर–लोणार मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सिद्धार्थ खरात यांनी आज, दिनांक १९ डिसेंबर २०२५ रोजी मौजे वेणी (ता. लोणार, जि. बुलढाणा) येथे भेट दिली. येथील परमपूज्य संत श्री आश्रूबाबा महाराज सेवाश्रम येथे आयोजित श्री संत आश्रूबाबा महाराज व श्री लिंबेश्वर महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण कार्यक्रमाच्या सांगता सोहळ्यास आमदार खरात यांची विशेष उपस्थिती लाभली.



या निमित्ताने परमपूज्य श्री १००८ स्वामी हरी चैतन्यानंद सरस्वती महाराज (पळसखेड) यांच्या वतीने आयोजित श्रीमद् भागवत कथा कार्यक्रमाचीही आज सांगता झाली. शेवटच्या दिवशी झालेल्या काल्याच्या कीर्तनप्रसंगी आमदार सिद्धार्थ खरात यांनी उपस्थित राहून दर्शन घेतले व संत-महंतांचे आशीर्वाद घेतले.

या कार्यक्रमास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हा प्रमुख प्रा. आशिष रहाटे, जिल्हा संघटक


डॉ. गोपाळ बच्छीरे, लोणार तालुका अध्यक्ष राजेंद्र बुधवत, समन्वयक तेजराव घायाळ, मेहकर शहर अध्यक्ष किशोरभाऊ गारोळे, युवासेना तालुका प्रमुख जीवन घायाळ, लोणार शहर अध्यक्ष गजानन जाधव, सूदन अंभोरे, गणेश कोठे, गोपाळ कोठे, साहेबराव हिवाळे पाटील, विष्णू जोगदंड, महिला आघाडी तालुका प्रमुख तारामती जायभाये यांच्यासह अनेक मान्यवर व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments