सोनाटी येथे कुलदैवत श्री मल्हारी माळसाकांत खंडोबा यात्रा निमित्ताने आ. सिध्दार्थ खरात यांनी घेतले दर्शन
मेहकर :गजानन राऊत
दि:१९-१२-२०२५
सोनाटी (ता. मेहकर): येथील कुलदैवत
श्री मल्हारी माळसाकांत खंडोबा यांची वार्षिक यात्रा भक्तिभावात व उत्साहात पार पडली. महाराष्ट्राच्या श्रद्धा-परंपरेतील पूजनीय लोकदैवत म्हणून खंडोबांना विशेष महत्त्व आहे. शौर्य, न्याय व भक्तवत्सलतेचे प्रतीक असलेल्या मार्तंड मल्हारींच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती या हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला विषेश मंजे भाविक भक्तांन साठी पाणी पिण्याची योग्य यवस्ता या संस्थानच्या वतीने केली जाते यात्रेनिमित्त विधिवत पूजा-अर्चा करून भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सर्व स्तरातील भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. मेहकर व लोणार मतदारसंघाचे लोकप्रियआमदार सिध्दार्थ खरात यांनी या वेळी महाप्रसादाचा वाटप करून खंडोबाचे दर्शन घेतले
या वेळी जिल्हा उपप्रमुख प्रा. आशिष रहाटे, तालुका प्रमुख निंबाभाऊ पांडव, दत्ता पाटील घनवट, डॉ. बदर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



Post a Comment
0 Comments