Type Here to Get Search Results !

वसाडी प्रा, आ, केंद्रात जळलेल्या औषधी मुदतबाह्य तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी केली प्राथमिक चौकशी

 वसाडी प्रा, आ, केंद्रात जळलेल्या औषधी मुदतबाह्य तालुका आरोग्य  अधिकाऱ्यांनी केली प्राथमिक चौकशी 


मेहकर बुलेटिन एक्सप्रेस न्युज

 बुलढाणा दि;१७/१२/२०२५

आरोग्य विभागाचे तीन तेरा





बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र

वसाडी येथे औषधे जाळण्याबाबत दि १७डिसेंबर २०२५ रोजी प्रसर माध्यमातील  वृत्ताची दखल घेत तालुका आरोग्य अधिकारी संग्रामपूर 


डॉ. चंद्रशेखर मारोडे यांनी तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रावर भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करत  प्राथमिक चौकशी केली  या प्राथमिक चौकशीत जाळलेल्या औषधी  मुदतबाह्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे तसेच शासकीय औषधीची विल्हेवाट लावण आयाच्या प्रक्रियेचे उल्लंघन   झाल्याचेही या चौकशी अहवालात नमूद करण्यात आले आहे  या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून जोशीवर कारवाई केली जाईल अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते यांनी दिली आहे अहवाल नुसार प्राथमिक आरोग्य केंद्र वसाडी हे दि १०मार्च २०२४ पासून कार्यन्वित असून ग्रामीण भागातील नागरिकांना प्राथमिक आरोग्य सुविधा देण्याचे महत्त्वाचे काम  या केंद्रामार्फत केल्या जाते

सध्या इथे कंत्राटी   वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. श्रीमती साधना गोंड दि १९ ऑगस्ट २०२५ पासून कार्यरत आहे तर बंदपत्रित वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. ऋषिकेश घनोकार हे दि २८ मे २०२५ पासून  सेवा बजावत आहेत  केंद्रातील काही पॅमेडिकल कर्मचारी बाह्यस्त्रोत




 पद्धतीने पद्धतीन नियुक्त करण्यात आले असून  हे  कर्मचारी  वर्टरहॉस्पिटॅलिटी प्रा, ली ,या , कंपनी मार्फत  कार्यरत आहेत  यामध्ये आरोग्य सहाय्यक जि, एच राठोड औषध निर्माण अधिकारी ऋषिकेश यादगिरे यांचा समावेश आहे हे सर्व  हे सर्व कर्मचारी दि, ११ ऑगस्ट २०२५ पासून सेवेत असल्याची नोंद चौकशीत आढळून आली आहे दि १६ डिसेंबर २०२५ रोजी  प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हालचाल  रजिस्टराची पाहणी केली असता वैद्यकीय अधिकारी डॉ,साधना गोंड व  आरोग्य सहाय्यक ,जी एच राठोड हे   मौजे आलेवाडी येथे लसीकरण सत्रासाठी गेले असल्याचे स्पष्ट झाले तसेच  सकाळची ओपीडी पूर्ण झाल्यानंतर  वैद्यकीय अधिकारी डॉ.ऋषिकेश घनोकार व इतर कर्मचारी  केंद्रातून निघून गेले होते मात्र  पुरुष शिपाई  आकाश महाले व रवी मुजाल्दा  हे केंद्रावर उपस्थित असल्याची नोंद आहे  दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवाराची पाहणी केली असता  मुदत संपलेल्या औषधी  अर्धवट जाळलेल्या अवस्थेत आढळून आल्या आहेत  यामध्ये साय. मेट्रोनिडा झोल ( मुद्दत १२/२०२५) १० बाटल्या  कॅल्शियम गोळ्या(०८/१०१५) ५००नग डेक्सा मेथासोन इंजेक्शन (११/२०२५) २० व्हयल्स फेनारा  माइन  इंजेक्शन (१० २०२५) ५० व्हायल्स तसेच जेन्टा मायसिन इंजेक्शन(११/२०२५) २०० व्हायल्सचा  समावेश आहे यापैकी मेट्रोनिडाझोल या औषधीची मुद्दत चालू महिन्यात संपत असली तरी उर्वरीत औषधे  मुदतबाह्य  असल्याचे निदर्शनास आलेआहे चौकशी दरम्यान औषध निर्माण अधिकारी  ऋषिकेश यादगीरे व  पुरुष शिपाई छगन माळी यांनी  कोणालाही पूर्वकल्पना न देता तसेच शासनाने ठरवून  दिलेल्या विहीत प्रक्रियेचे  पालन न करता ही औषधे  जाळण्याचे प्राथमिक   चौकशीत स्पष्ट झाले आले   या प्रकरणाची गंभीर दखल घेत  पुढील सखोल चौकशी करण्यात येत असून  दोषी आढळणाऱ्या  संबंधितावर नियमानुसार कारवाई केली जाईल असे स्पष्ट  संकेत जिल्हा  आरोग्य अधिकारी डॉ.आमोल गीते यांनी दिली आहे तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नये यासाठी

सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना औषध व्यवस्थापन व विल्हेवाटीबाबत स्पष्ट सूचना देण्यात येणार असल्याचे ही त्यांनी नमूद केले आहे 

Post a Comment

0 Comments