Type Here to Get Search Results !

शौर्यदिनी शूरवीरांना स्वरसम्राटची सूरमय मानवंदना

 शौर्यदिनी शूरवीरांना स्वरसम्राटची सूरमय मानवंदना



मांगुळ झनक (ता. रिसोड) | ३ जानेवारी

प्रतिनिधी गजानन राऊत



रिसोड तालुक्यातील मांगुळ झनक येथे शौर्यदिनी शूरवीरांना गीतांच्या माध्यमातून भावपूर्ण मानवंदना देण्यात आली. प्रबोधनात्मक संगीतमय कार्यक्रम दि. २ जानेवारी रोजी उत्साहात पार पडला.


स्वरसम्राट जनजागृती कलामंच, आंध्रुड (ता. मेहकर, जि. बुलढाणा) यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात सुरेल, प्रबोधनात्मक, मनोरंजनपर तसेच महापुरुषांवरील गीतांच्या सादरीकरणाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

शाहीर भिमराव अंभोरे, साहेबराव अंभोरे, दत्ता पवार व संदीप बोदडे यांनी सुमधुर व स्फूर्तीदायी गीतांनी कार्यक्रमात रंगत आणली.



यावेळी निळ्या पाखरांची वंदना भीमराया, मानवा जा बुद्धाला शरण, नववर्षाची सुरुवात करतो ५०० महारांना सलामी देऊन, डॉक्टर झाली कलेक्टर झाली, बाई माव्हा पोरगा साहेब झाला, आहे बाबासाहेबांचं देणं, कुणी नाही केलं भलं व माय भीमानं केलं, बाबासाहेबांनी दिलं रं, रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे, काळजवरी कोरले नाव भीमा कोरेगाव अशी एकाहून एक स्फूर्तीदायी गीते सादर करण्यात आली. शेवटी भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.


महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध बँजो वादक संदीप बोदडे व ढोलक वादक सिद्धेश्वर बोराडे यांनी उत्कृष्ट साथसंगत केली. कोरसची जबाबदारी सत्यभामा कांबळे व शंकुतला अंभोरे यांनी समर्थपणे सांभाळली.


कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन वत्सगुल बुद्ध विहार व्यवस्थापन समिती, मांगुळ झनक तसेच क्रांतीसूर्य नवयुवक मंडळ यांच्या वतीने शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले. यामध्ये पुंडलिक दौलत लेमाडे, रामकिसन सत्यभान डुकरे, नंदकिशोर आत्माराम लेमाडे, गजानन दत्तात्रय लेमाडे, गणेश गोपाल डुकरे, प्रविण प्रकाश झरे, दत्ता वामन वारे, विलास प्रल्हाद साबळे, प्रदीप निवृत्ती लेमाडे, कृष्णा भास्कर वारे व गौतम पुंजाजी लेमाडे यांनी विशेष परिश्रम घेतले.


कार्यक्रमाला परिसरातील मोठ्या संख्येने महिला, पुरुष व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी गायकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दररोजच्या १८ तासांच्या अभ्यासाचे महत्त्व विषद केले. बुद्धवंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली.


शाहीर भिमराव अंभोरे, साहेबराव अंभोरे व दत्ता पवार हे गेल्या ३० वर्षांपासून स्वरसम्राट जनजागृती कलामंच, आंध्रुडच्या माध्यमातून भीमगीतांद्वारे समाजाच्या तळागाळात जाऊन प्रबोधनाचे कार्य करत आहेत. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत त्यांच्या कार्यक्रमांना रसिकांची मोठी पसंती मिळते. साधी-सोपी भाषा, प्रभावी शेरोशायरी व सुमधुर गायन ही या कला समूहाची खास वैशिष्ट्ये आहेत.

Post a Comment

0 Comments